Friday, April 20, 2012

टिकटं प्लीज

काल सकाळी नेहमीप्रमाणे सी एस टी ला जाणारी स्लो लोकल पकडली. बसायला छान विंडो सीट मिळाली, आ..हा..हा... काय नशीब. चला आता दादर पर्यंत चिंता नाहि. लोकल सुरू झाली आणि डोळे मिटुन घेतले ते एकदम सायनलाच उघडले. मग जरा स्थिरस्थावर होत दादरला उतरायची तयारी सुरू केली. लोकल दादर स्टेशनवर थांबली आणि मी त्या उतरणार्‍या लोकांच्या घोळक्यातून दरवाजाच्या दिशेने सरकत बाहेर आलो. बाहेर खूप गर्दी होती, पण त्या गर्दीत सुद्धा कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला म्हणून मागे वळून पाहिल तर तो टी सी होता. मी थोड त्रासीक नजरेने त्याच्याकडे पाहिल कारण आजपर्यंत मी टी सी ह्या प्रकाराचा सामना फारच कमी केला आहे, त्यामुळे असेल कदाचित.
"सर! टिकिट प्लीज"
मग मी अजूनच त्रासीक चेहरा करत खिशात हात घातला, पाकीट काढलं आणि त्याच्यासमोर पास धरला. पण तेवढ्या वेळात तो एका दुसर्‍या व्यक्तीशी बोलण्यात व्यस्त होता.
"अरे मेरा जल्दी करो यार, ऑफिस जाने के लिये लेट हो रहा है"
मग त्यान माझ्या पास मध्ये लक्ष घातल.
"सर, ये तो दो दिन पहलेहि खतम हुआ है"
मी एक्दम चमकलो, अरे देवा पास संपला का, मी पास वरची तारीख पाहिली आणि तो खरच संपला होता. माझं सगळं अवसान गळून गेलं.
"अरे बापरे! अब क्या करनेका?"
"आपको फाइन भरना पडेगा. फर्स्ट क्लास का है इसलिये ३७५ रू होगा"
तो पावती पुस्तक खिशातून काढत म्हणाला. मग मी माझ्या पाकिटात पाहिल तर फक्त दिडशे रुपये होते.
"पर अभी मेरे पास इतना पैसा नहि है"
"ठिक है जरा साईड मे चलो"
मग तो मला मोठ्या विजयी मुद्रेने त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला आणि मला खुर्चीवर बसवत म्हणाला.
"देखो सर कायदे से तो ३७५ होते है."
"लेकिन मेरे पास तो इतने है नहि. जरा देखोना कुछ होता है तो."
मी शक्य तितक्या आर्जवी स्वरात त्याला म्हटलं. मग तो थोडे आढेवेढे देत म्हणाला.
"ठिक है सर आप कितना दे सकते हो"
"देखो मेरे पास अभी सिर्फ देडसो है उसमे से मै १०० दे सकता हु."
"अरे सर १०० से क्या होगा कमसेकम २५० देना पडेगा"
"अरे यार ये देखो मेरा वॉलेट मेरे पास इतने रुपये है हि नहि. चाहिये तो एक काम करो किसीको मेरे साथ भेजदो मै ए टि एम से निकालकर देता हु."
तो थोडा विचारात पडला.
"ठिक है सर १०० दे दो आप जैसे शरीफ आदमी के साथ सख्ती करना अच्छा नहि लगता.
मी पटकन त्याच्या हातावर १०० ची नोट ठेवली.
"अभी आगे जानेसे पहले पास निकालकर जाओ."
"जरूर, धन्यवाद"

मग मी तिकडनं बाहेर निघालो आणि वर ब्रीज चढायला लागलो. पण मन मात्र सतत खात होत. एकीकडे आपण म्हणतो ह्या देशात खूप भ्रष्टाचार झालाय आणि दुसरीकडे आपणच आपल्या कृतीतून भ्रष्टाचाराला पाठिंबा देतो. मी ३७५ रू वाचवण्याकरता १०० रू ची कोणाला तरी लाच दिली. माझा प्रश्न सुटला होता मात्र भ्रष्टाचाराच्या रोपाला मी कळत नकळत आज कुठेतरी खतपाणी घातल होत. प्रत्येकजण जर असच करायला लागला तर भ्रष्टाचार हा क्धीच संपणार नाहि. त्याकरता कितीही अण्णा हजारे आले तरी काहिच फरक पडणार नाहि. आणि मग मनाशी निश्चय पक्का केला. ए टि एम मधुन पासाचे रू + २७५ काढले. मग प्रथम पास काढला आणि खाली उतरून परत त्या टि सी च्या ऑफिसमध्ये गेलो. तो टि सी तिथेच बसला होता. त्याच लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो आश्चर्यानं म्हणाला.
"अरे आप?"
"ये लो बाकिका २७५ रू."
"अरे इसकि क्या जरूरत थी? ये सब तो चलता हि रहता है"
"नहि मैने कानून तोडा है तो मुझे फाइन भरनाहि पडेगा. प्लीज मुझे इसकि रसीद दे दिजीये"
मग त्यान माझ्याकडे पाहिल आणि मला मी भरलेल्या दंडाची पावती दिली. मी जेव्हा त्याच्या ऑफिसमधून बाहेर आलो तेव्हा मनात एकच विचार होता.
"आज मी भ्रष्टाचाराला विरोध केला."

No comments:

Post a Comment